खडक वाहतूक पोलिसांकडून वरिष्ठांच्या आदेशाची ऐशी की तैशी !

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

गोटीराम भैय्या चौकात ६ जण का लागतात कारवाईला ? नागरिकांचा संतप्त सवाल ?

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ( ACS NEWS ) प्रतिनिधी

मध्यंतरी पोलिस आयुक्तांनी चौका चौकातून वाहतूक पोलिस काढून घेतल्याने पुणेकरांनी सुटकेचा श्वास घेतला होता .

Pune Traffic Police वाहतूक पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार .

परंतू आता पुन्हा रस्त्यावर गरडा घालून साज शोधताना वाहतूक पोलिस दिसत आहेत , तर विषेश म्हणजे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशालाच पायदळी तुडवून केराची टोपली दाखवली जात आहे . चौकात दोन अंमलदारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी थांबू नये असे कंट्रोल रूम मधून बीसीद्वारे ( broadcasting ) वरिष्ठांनी आदेश होते , त्यात कडक कारवाईचा देखील इशारा वरिष्ठांनी दिला होता . परंतु आदेश देऊनही खडक वाहतूक पोलिसांनी त्या आदेशाची ऐशी की तैशी केली आहे .

गोटीराम भैय्या चौक , प्यासा हॉटेल जवळ पाच सहा जण मिळून कारवाई करत असताना ( ACS NEWS ) निर्दशनास आले आहे.टिंबर मार्केट , घसेटी पूल , कस्तूरी चौक , पालखी चौक व इतर ठिकाणी वाहतूक जाम होत असतानाही फक्त गोटीराम भैय्या चौकातच ६ पोलिस पावत्या फाडताना दिसून येत आहे . आजूबाजूच्या दुकानदारांकडून माहिती घेतली असता रोजच कारवाई करून नागरिकांना वेठीस धरून पैसे उकळले जातात , रिक्षा चालक कसेही रिक्षा उभी करून अवैध प्रवासी वाहतूक करत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती दिली आहे . अश्या वाहतूक पोलिसांवर कारवाईची मागणी होत असून पोलिस आयुक्त याची दखल घेऊन वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करणार का ? याकडे लक्ष टिकून राहाणार आहे .

” ” गोटीराम भैय्या चौक ड्युटी एकाची प्रत्यक्षात दुसरेच हजर

गोटीराम भैय्या चौकात सदरील चौकात ५ ते ६ कर्मचारी उपस्थित होते . पीआय यांना फोन लावताच कर्मचाऱ्यांनी ठोकली धूम ” ” खडक वाहतूक विभागातील पोलिस निरीक्षक यांनी प्रतिनिधींनी संपर्क साधून गोटीराम भैय्या चौकातील सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता ते म्हणाले की तेथे पीएसआय पवार व त्यांचे राईटर पवार हे आणि पेट्रोलिंगसाठी जोडी असल्याचे सांगितले , परंतु पीएसआय पवार हे इतरत्र कुठेही कारवाई करताना दिसत नाही ? परंतु पीआयशी चर्चा झाल्यानंतर काही मिनिटांतच पोलीस कर्मचारी चौकातून गायब झाले .

ट्राफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही,

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *