पुण्यात राजकीय घडामोडींना वेग; काशिफ सय्यद यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षातून राजीनामा देत काशिफ सय्यद यांनी आज कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.
काँग्रेस प्रवेशाच्या वेळी व्यासपीठावर काशिफ सय्यद यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते काँग्रेस मध्ये प्रवेश.माजी मंत्री मोहनदादा जोशी, पुणे प्रशांत जगताप, तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचा शाल व पक्षचिन्ह देत काशिफ सय्यद यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी बोलताना काशिफ सय्यद म्हणाले की, काँग्रेसची विचारधारा, धर्मनिरपेक्षता आणि सर्वसामान्य जनतेसाठीची लढाऊ भूमिका यामुळे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे शहर आणि विशेषतः कोंढवा–कौसरबाग परिसरातील विकास, युवकांचे प्रश्न, शिक्षण व आरोग्य विषयांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रवेश सोहळ्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. काशिफ सय्यद यांच्या प्रवेशामुळे पुणे शहरात काँग्रेस पक्षाला संघटनात्मक बळ मिळेल, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
