भवानिपेठमधील नव्या रस्त्यावर ठेकेदाराची निष्काळजीपणा; अवघ्या महिन्यातच ड्रेनेज झाकण खचले,apcs in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे | भवानिपेठ,
भवानिपेठ मोटार स्टँड ते आलंकार चौक मार्गावर, कुमार गॅलेक्सी सोसायटीसमोर रस्त्याचे काँक्रीटचे काम करण्यात आलेल्या रस्त्याला अवघा एक महिनाही पूर्ण झालेला नसताना ड्रेनेज लाईनचे झाकण (मॅनहोल कव्हर) खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता तयार करताना निकृष्ट व स्वस्त साहित्याचा वापर करण्यात आला आहे. परिणामी, ड्रेनेज लाईनवरील झाकण खाली बसले असून, सध्या तरी हे ठिकाण वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. पुढील काळात रस्ता पूर्णपणे सुरू झाल्यानंतर पीएमटी बससेवा व जड वाहतूक सुरु होणार आहे. अशा वेळी या खचलेल्या झाकणाची अवस्था आणखी गंभीर होण्याची शक्यता असून, अपघाताचा धोका वाढणार आहे.
या प्रकरणाकडे पुणे महानगरपालिका प्रशासनातील संबंधित अभियंते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तक्रारी करूनही ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “आजच जर ही अवस्था असेल, तर जड वाहनांनंतर संपूर्ण झाकण तुटल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांनी पुणे महानगरपालिकेने तातडीने पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच दोषी काम दुरुस्त करून सुरक्षित दर्जाचे साहित्य वापरण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
