दलित समाजातील तरुणीची नाशिक पोलिसांकडे तक्रार,प्रेम, लग्नाचे आश्वासन, शारीरिक शोषण आणि आता ११ महिन्यांच्या बाळासह फसवणूक,apcs in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
🔴 धक्कादायक आरोप | नाशिकमधील गंभीर प्रकरण
प्रेम, लग्नाचे आश्वासन, शारीरिक शोषण आणि आता ११ महिन्यांच्या बाळासह फसवणूक — दलित समाजातील तरुणीची नाशिक पोलिसांकडे तक्रार,

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात समाजाला हादरवणारे गंभीर प्रकरण समोर आले आहे. दलित समाजातील एका तरुणीने प्रेमाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तरुणीच्या म्हणण्यानुसार, भिमसिंग कबीर नाईक (Hindu) या तरुणाने “मी तुझ्याशी लग्न करणार” असे सांगत तिच्याशी दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवले.

या संबंधांतून तरुणीला मूल झाले असून, आज त्या बाळाला तब्बल ११ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, बाळ झाल्यानंतरही आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. यामुळे तरुणी आणि तिच्या बाळाचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र आहे.

🔹 नाशिक पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल
या संपूर्ण प्रकरणी पीडित तरुणीने नाशिक पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

🔹 अवैध SPA चालवण्याचे आरोप
तरुणीचा आणखी गंभीर आरोप असा आहे की, भिमसिंग कबीर नाईक हा नाशिक, मुंबई तसेच कर्नाटक राज्यात अवैधरीत्या SPA चालवत असल्याचे आरोप असून, यासंदर्भात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
https://share.google/JHuB7HCjY6P9Kg9bO
https://share.google/vxvK8FrjyDNC6FKJS

🔹 पोलीस ओळखीचा धाक दाखवण्याचा आरोप
पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी वारंवार “नाशिक पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, माझे पोलिस ठाण्यात येणे-जाणे आहे” असे सांगून तिला मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे.

👉 ११ महिन्यांच्या बाळासह न्यायासाठी लढणाऱ्या या तरुणीला न्याय मिळणार का?
👉 महिला सुरक्षा, दलित समाजावर होणारा अन्याय आणि कायद्यावरील विश्वास या प्रकरणामुळे ऐरणीवर आले आहेत.

📌 टीप: वरील बातमी ही पीडितेच्या तक्रारी व आरोपांवर आधारित असून, प्रकरण सध्या तपासाधीन आहे. अंतिम सत्य तपास व न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.
