२० दिवसांच्या अथक तपासानंतर चाकण उत्तर पोलिसांचा मोठा यशस्वी कारनामा,अज्ञात इसमाच्या खुनाचा छडा, तिघे आरोपी अटकेत,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
चाकण उत्तर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या अज्ञात इसमाच्या खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल २० दिवसांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली असून खुनामागील संपूर्ण कट उघड केला आहे.

दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी चाकण परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा नसतानाही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, परिसरातील साक्षीदार, सोशल मीडिया व गोपनीय माहिती यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून आरोपींचा माग काढत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, ओळखीतील वादातून कट रचून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात वापरलेले साहित्य व इतर पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण उत्तर पोलिसांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस आयुक्तालयाने तपास पथकाचे कौतुक केले आहे.
पुढील तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रिया राबवली जात आहे.
