कोंढवा प्रभाग १९ मध्ये आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप; शाळकरी मुलांच्या वापरावर तक्रार,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंढवा–कौसरबाग | प्रतिनिधी
पुणे | प्रतिनिधीपुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर कोंढवा खुर्द–कौसरबाग, प्रभाग क्रमांक १९ मध्ये आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गंभीर आरोप समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका उमेदवारावर प्रचारासाठी शाळकरी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा आरोप करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, TIMES शाळेच्या परिसरात व शाळेतील CCTV कॅमेऱ्यांमध्ये उमेदवाराच्या प्रचाराशी संबंधित दृश्ये कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रचार साहित्याचे वाटप तसेच निवडणूक चिन्हाचा वापर शाळकरी मुलांच्या माध्यमातून केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. याबाबत फोटो व व्हिडिओ स्वरूपातील पुरावेही तक्रारीसोबत जोडण्यात आल्याचे सांगण्यात येते.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आदर्श आचारसंहिता व निवडणूक नियमांनुसार अल्पवयीन मुलांचा प्रचारात वापर करणे हा गुन्हा असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेची पवित्रता धोक्यात येते. त्यामुळे संबंधित उमेदवारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या प्रकरणी निवडणूक प्रशासनाने तक्रारीची दखल घेतली असून, CCTV फुटेज व उपलब्ध पुराव्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेमुळे कोंढवा प्रभाग १९ मधील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे नागरिकांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कोंढवा प्रभाग क्रमांक १९ (ड) मध्ये नवीन, सक्षम आणि लोकांशी थेट जोडलेले नेतृत्व म्हणून तहेझीब सिद्दीकी यांच्याकडे पाहिले जात असून, आगामी निवडणुकीत त्या कितपत यशस्वी ठरतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
