दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची गजाआड यात्रा;पुणे व रायगडमधील ४ गुन्ह्यांचा उलगडा,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची गजाआड यात्रा; पुणे व रायगडमधील ४ गुन्ह्यांचा उलगडा,

पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा क्र. २ यांनी महाराष्ट्रात दिवसा घरफोडी करून दहशत माजवणाऱ्या दोन अट्टल घरफोड्या चोरट्यांना अटक केली असून, त्यापैकी एक विधी संघर्षित बालक आहे. त्यांच्या ताब्यातून पुणे शहर आणि रायगड जिल्ह्यातील एकूण ४ घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अटक आरोपींची माहिती:
1️⃣ सुनील मल्हारी तलवारे
वय – ३८ वर्षे,रा. केएसबी चौक,अंठानगर, मस्जिदजवळ, आकुर्डी.
2️⃣ विधी संघर्षित बालक (यश उर्फ घट्ट दत्ता देशमुख)
वय – १७ वर्षे ७ महिने रा. सदर या दोघांनी नोव्हेंबर महिन्यात पुणे शहर व रायगड जिल्ह्यात दिवसा घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे उघडकीस आले:
- समर्थ पोलीस स्टेशन
- खराडी पोलीस स्टेशन
- चंदननगर पोलीस स्टेशन
- महाड शहर पोलीस स्टेशन (जि. रायगड)
वरील चारही ठिकाणचे घरफोडीचे गुन्हे उघड झाले असून पुढील तपासासाठी आरोपींना समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. २५७/२०२५ भा.दं.वि. कलम ३०५(१), ३३१(१), (३) अंतर्गत ताब्यात देण्यात आले आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व पथक,
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
सपोनी छबू बेरड,पोउनि संतोष तानवडे,स.पो.फौ. राजू पुणेकर,दिनकर लोखंडे,राजेश लोखंडे,पो. हवालदार गणेश लोखंडे (पो. हवा ६८५०),सुरेश जाधव,संदीप येळे,विक्रांत सासवडकर,विनायक येवले,प्रफुल मोरे,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
