Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsTraffice Police

भावानी पेठ : चुडामन तालीम, बी. टी. साहनी स्कूलसमोर रस्ता कामामुळे नागरिकांना मोठा त्रास,स्वयम् क्लिनिक अँड नर्सिंग होम’ येथे रुग्णांची ये-जा अडथळ्यात;,?apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

भावानी पेठ : चुडामन तालीम, बी. टी. साहनी स्कूलसमोर रस्ता कामामुळे नागरिकांना मोठा त्रास,स्वयम् क्लिनिक अँड नर्सिंग होम’ येथे रुग्णांची ये-जा अडथळ्यात; कंत्राटदार निष्काळजीपणे काम करत असल्याचा आरोप,?

भावानी पेठ परिसरातील चुडामन तालीम, बी. टी. साहनी स्कूलच्या समोर स्वयम् क्लिनिक अँड नर्सिंग होम (डॉ. रांका) आहे. सध्या येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने रुग्ण आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

रुग्णवाहिका तसेच तातडीच्या रुग्णांना ये-जा करणे कठीण झाले असून, रुग्णांना स्ट्रेचरवरून हालचाल करताना धोकादायक परिस्थिती निर्माण होते. परिसरातील रहिवाशांनी कंत्राटदाराकडून निष्काळजीपणे, नियम न पाळता काम सुरू ठेवल्याची तक्रार केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी कंत्राटदाराला नियमांनुसार काम करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कंत्राटदार मनमानीपणे काम सुरूच ठेवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांचा प्रश्न असा की—
“या रस्त्यावरील अव्यवस्थेमुळे एखादा रुग्ण अडला, कोणी पडले, अपघात झाला किंवा जीवितहानी झाली तर याची जबाबदारी कोण घेणार?”

अनेक वेळा तक्रार करूनही पुणे महानगरपालिका कंत्राटदाराविरोधात कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कंत्राटदाराला राजकीय पाठबळ आहे का? दबाव आहे का? असा सवालही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतरच PMC कारवाई करणार का, असा संतप्त प्रश्न भावानी पेठ येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *