Breaking NewsLatest NewsPMC News

उपआयुक्त सोमनाथ बनकर यांची अतिक्रमण विभागाची धडक कारवाई;apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

उपआयुक्त सोमनाथ बनकर यांची अतिक्रमण विभागाची धडक कारवाई; रस्ता रुंदीकरणासाठी अडथळे हटवले,


पुणे : उपआयुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने आज धडक कारवाई करत मुंढवा ताडी गुत्ता ते हडपसर रेल्वे स्टेशन आणि हडपसर रेल्वे स्टेशन ते तुलसी हॉल या मार्गावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असलेल्या अनधिकृत बांधकामे, शेड, फलक व इतर संरचना हटवून जागा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली.


या कारवाईदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत पत्र्याच्या शेड, कुंपण व जाहिरात फलक जमीनदोस्त करण्यात आले. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उपआयुक्त सोमनाथ बनकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “जिथे कुठे अतिक्रमण आढळेल तिथे तात्काळ कारवाई केली जाईल. नागरिकांनी अतिक्रमण करू नये आणि सर्वसामान्यांना त्रास होईल असे प्रकार टाळावेत.”


महापालिकेच्या या कारवाईमुळे रस्ता रुंदीकरणाचे काम गतीने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *