Breaking NewsLatest NewsPCMCPMC NewsTraffice Police

कॅम्प परिसरात गार्डन वडा पाव’पुन्हा सुरू ट्रॅफिक जाम – गार्डन वडा पाव’ स्टॉलवर कारवाईचा अभाव!apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

कॅम्प परिसरात पुन्हा ट्रॅफिक जाम –पुणे कॅम्प परिसरातील ‘गार्डन वडा पाव’वर पुन्हा प्रश्नचिन्ह!?

पुणे कॅम्प परिसरातील ‘गार्डन वडा पाव’च्या समोर दररोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी अवैधपणे लावण्यात आलेल्या वडा पाव स्टॉलमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.तरीदेखील संबंधित व्यक्तीने पुन्हा अवैधरित्या स्टॉल लावून व्यापार सुरू केला आहे.

पूर्वी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाने आणि लष्कर पोलिस ठाण्याने या ठिकाणी कारवाई करून अवैध स्टॉल हटवला होता. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा ‘गार्डन वडा पाव’वाले बिनधास्तपणे स्टॉल लावून व्यवसाय करताना दिसत आहेत.

सामान्य नागरिक जर रस्त्यावर हातगाडी लावतात, तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करून हातगाड्या उचलल्या जातात. मग या गार्डन वडा पाव सारख्या मोठ्या स्टॉलवर कारवाई का होत नाही? कॅन्टोन्मेंट अतिक्रमण विभाग आणि या स्टॉलधारकांमध्ये काही मिलीभगत आहे का?

या ठिकाणी दुचाकींची आणि चार चाकी डबल पार्किंग, अनधिकृत स्टॉल्स आणि गर्दीमुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. नागरिकांच्या तक्रारी असूनही पोलिस विभाग आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड अतिक्रमण विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

स्थानिक नागरिकांचा प्रश्न ???— “गार्डन वडा पाववाल्यांचा पोलिस व अतिक्रमण विभागाशी संगनमत आहे का?” — असा उपस्थित होत आहे.अशा दुहेरी निकषांवर प्रशासन किती काळ मौन बाळगणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

नागरिकांची मागणी आहे की, या ठिकाणी ताबडतोब अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात यावी आणि वाहतुकीसाठी मोकळा मार्ग उपलब्ध करून द्यावा.

नागरिकांचे आवाहन:
कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या ठिकाणी कायमस्वरूपी कारवाई करावी, अन्यथा नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in




wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *