कोंढवा खुर्द शिवनेरी नगर,गली नं.1 मध्ये बेकायदेशीर खड्डा उत्खनन;परवानगीशिवाय काम करणाऱ्या बिल्डरांविरोधात तक्रार दाखल ,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंधवा खुर्दमध्ये बेकायदेशीर खड्डा उत्खनन; परवानगीशिवाय काम करणाऱ्या बिल्डरांविरोधात तक्रार दाखल ,
पुणे | कोंढवा खुर्द – शिवनेरी नगर, गली नं. 1 (सर्व्हे नं. 53) परिसरात काही बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खड्डा खोदण्याचे काम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या उत्खननासाठी कोणतीही मसूल खाते ( तलाठी ), खानिज उत्खनन विभाग तसेच पुणे महानगरपालिकेची परवानगी घेतलेली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.?

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून, मोठ्या खोल खड्ड्यात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या वेळी JCB मशीनद्वारे उत्खनन सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.

अँटी करप्शन स्क्वॉडकडे तक्रार,
अँटी करप्शन स्क्वॉडचे ऑल इंडिया प्रेसिडेंट वाजिद खान यांनी या बेकायदेशीर काम विरोधात मसूल खाते (तलाठी कार्यालय) येथे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार:
बिल्डरांनी कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात खड्डा उत्खनन केले,
महसूल व गौण खनिज उत्खनन विभागाला शुल्क न भरता बेकायदेशीररीत्या काम सुरू,
पुणे महानगरपालिकेकडून कोणतेही बांधकाम किंवा उत्खनन परवाना घेतलेला नाही,
नागरिकांना धोक्यात टाकून बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न,
प्रशासनाकडून तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी,अँटी करप्शन स्क्वॉड,वाजिद खान,कडे,

प्रशासनाची जबाबदारी वाढली,
स्थानिक नागरिकांनीही या बेकायदेशीर कामामुळे परिसरात निर्माण झालेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
सध्या:
पुणे महानगरपालिका /मसूल खाते / तलाठी कार्यालय/खनिज उत्खनन विभाग/स्थानिक पोलीस/यांनी तातडीने जागेवर तपासणी करून बेकायदेशीर काम थांबवून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.वाजिद खान ने केली आहे,

कोंढवा खुर्द येथील शिवनेरी नगर, गली नं. 1 (सर्व्हे नं. 53) भागात कोणतीही सरकारी परवानगी न घेता सुरू असलेले हे उत्खनन हे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे असून, अँटी करप्शन स्क्वॉडकडून दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
