कोंढव्यात बॅनर बदलामुळे राजकीय चर्चांना उधाण,एका गटाशी निष्ठा दर्शवणारे हेच उमेदवार आता वेगळ्या,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
एका गटाशी निष्ठा दर्शवणारे हेच उमेदवार आता वेगळ्या चिन्हासह आणि वेगळ्या नेतृत्वाच्या प्रतिमांसह प्रचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोंढव्यात बॅनर बदलामुळे राजकीय चर्चांना उधाण,
कोंढवा परिसरात राजकीय बॅनरवरील छायाचित्रांमध्ये झालेल्या बदलामुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाशी संबंधित उमेदवारांच्या बॅनरवर आधी असलेले नेत्यांचे फोटो हटवून दुसऱ्या गटातील नेत्यांचे फोटो लावण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
कोंढवा–कौसरबाग, प्रभाग क्रमांक १९ मध्ये निवडणूक प्रचार सुरू असतानाच या बदलामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत एका गटाशी निष्ठा दर्शवणारे हेच उमेदवार आता वेगळ्या चिन्हासह आणि वेगळ्या नेतृत्वाच्या प्रतिमांसह प्रचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या घडामोडींमुळे “राजकारणात कोण कधी कोणाच्या बाजूने उभा राहील, हे सांगता येत नाही” अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.बॅनरवरील ’बदल हे केवळ प्रचारात्मक की जनमताचा अंदाज घेऊन केलेला निर्णय, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विशेषतः ‘तुतारी’ या निवडणूक चिन्हाबाबत मतदारांचा कौल काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्तासमीकरणे, युती आणि स्थानिक सामाजिक घटकांचा प्रभाव पाहता, या बदलांचा नेमका फायदा कोणाला होणार, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी कोंढव्याच्या राजकीय वातावरणात या बॅनर बदलामुळे खळबळ उडाली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
