कोंढवा खुर्द भागात वीजपुरवठा खंडित – नागरिक त्रस्त, महावितरण अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही,मुस्लिम समाजालाच दुर्लक्ष केले जाते का???
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंढवा खुर्द भागात वीजपुरवठा खंडित – नागरिक त्रस्त, महावितरण अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही,
आज दिनांक शुक्रवार नमाजचा दिवस असून तसेच पैगंबर जयंतीचा पवित्र दिवस आहे. मात्र, या महत्त्वाच्या दिवशीच मिठानगर ९ नंबर गली, चेतना गार्डन, कोंढवा खुर्द या भागात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. तब्बल ६ तास उलटूनही अजूनपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही.

नागरिकांकडून फोनवर वारंवार संपर्क साधूनही महावितरण अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. तसेच, वायर्मनदेखील कामात विलंब करत असून दिवसभर टोलवाटोलवी करण्यात वेळ जातो, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, जर अशाच प्रकारचा वीजपुरवठ्याचा प्रश्न कुठल्या व्हीआयपी भागात झाला असता तर तात्काळ दुरुस्तीची पावले उचलली गेली असती. मात्र, सर्वसामान्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. एवढेच नाही तर, वारंवार अशा प्रकारे शुक्रवारीच वीजपुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे मुस्लिम समाजालाच दुर्लक्ष केले जाते का?, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महा वितरण) प्रशासनाने या गंभीर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
