पुणे कॅम्प टबुत स्ट्रीट ट्रॅफिक जाम प्रकरण लष्कर पोलिसांनी घेतली दखल,नागरिकांनी मानली आभार,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे कॅम्प टबुत स्ट्रीट ट्रॅफिक जाम प्रकरण लष्कर पोलिसांनी घेतली दखल,नागरिकांनी मानली आभार,
कॅम्प परिसरातील टबुत स्ट्रीट, दिल्ली दरबार रेस्टॉरंटसमोर आज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची घटना समोर आली.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हॉकर्सनी फूटपाथ व रस्त्यावरच जॅकेट विक्रीला ठेवून बसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहने जवळपास अडकून पडली होती.

ही गंभीर परिस्थिती पाहून जात असलेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना याबाबत माहिती दिली. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अनधिकृत रस्त्यावर बसलेल्या हॉकर्सवर कारवाई करून संपूर्ण रस्ता मोकळा केला.

पोलीसांनी दाखवलेल्या तत्पर कार्यवाहीमुळे वाहतूक काही वेळातच सुरळीत झाली. स्थानिक नागरिकांनी लष्कर पोलीस ठाण्याचे मनःपूर्वक आभार मानले असून, पोलिसांनी नागरिकांच्या सोयीसाठी जे तातडीने पाऊल उचलले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

