पुणे – MG रोडवरील ऑरोरा टॉवर्सच्या परिसरात अवैध हातगाड्या व हॉकर्सचा जोर; पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड आणि लष्कर पोलीस स्टेशन याकडे दुर्लक्ष? ‘आशीर्वाद’ मिळाल्याने वाढतोय व्यवसाय?apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे – MG रोडवरील ऑरोरा टॉवर्सच्या परिसरात अवैध हातगाड्या व हॉकर्सचा जोर; पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड आणि लष्कर पोलीस स्टेशन याकडे दुर्लक्ष? ‘आशीर्वाद’ मिळाल्याने वाढतोय व्यवसाय?

MG रोड, ऑरोरा टॉवर्सच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध हातगाड्या, हॉकर्स आणि स्नॅक्स सेंटर्सची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी तर होतेच, पण सुरक्षा धोकाही वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

विशेष म्हणजे, Union Bank, aur ,South Indian Bank आणि इतर व्यावसायिक आस्थापनांच्या अगदी समोर व बाजूलाच 10 ते 15 अवैध हॉकर्स दररोज उभे राहत आहेत. यामुळे बँक परिसर पूर्णपणे व्यापला जात असून नागरिकांना बँकेत व ATM मध्ये जाण्या-येण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

नागरिकांचे म्हणणे:
“जर अशा गर्दीत, अतिक्रमणाच्या वातावरणात बँकेत चोरी, स्नीचिंग किंवा कुठलीही गुन्हेगारी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? बँकेच्या अगदी खाली व बाजूला उभे असलेले स्नॅक्स सेंटर्स आणि हॉकर्स सुरक्षेला थेट धोका आहे.”

नागरिकांमध्ये हीही भावना व्यक्त होत आहे की —
“या अवैध धंद्यांना कुणाचातरी आशीर्वाद असल्याशिवाय इतक्या निर्भीडपणे व्यवसाय चालूच शकत नाही. ना लष्कर पोलीस स्टेशन लक्ष देते, ना पुणे कॅन्टोनमेंट बोर्डचा अतिक्रमण विभाग कारवाई करतो. विशेष म्हणजे शनिवार–रविवारी तर हा धंदा दुपटीने वाढतो.”

अतिक्रमण हटविण्याची कोणतीही मोहिम नाही, गुन्हे दाखल होत नाहीत, आणि परिसरातील सुरक्षा पूर्णपणे रामभरोसे सोडल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
