कोंढवा खुर्द व कोंढवा बु. परिसरात पुणे महानगरपालिकेची मोठी कारवाई;apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंढवा खुर्द व कोंढवा बु. परिसरात पुणे महानगरपालिकेची मोठी कारवाई;10500 चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त – बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याची PMC ची तयारी,

कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये अनाधिकृत बांधकामाविरोधात नियुक्त केलेल्या विशेष पथकाने आज दि. 19/11/2025 रोजी मोठी कारवाई केली. कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, गल्ली नंबर 29 येथे G+6 व G+7 मजल्यांच्या दोन इमारतींवर तब्बल 10500 चौ.फुट आर.सी.सी. बांधकामावर कारवाई करण्यात आली.

या कारवाईसाठी 6 बिगारी, 5 पोलीस कर्मचारी, 1 JCB, 4 ब्रेकर, 2 गॅस कटर, 5 कनिष्ठ अभियंता आणि 2 उपअभियंता उपस्थित होते. PMC च्या पथकाने मोठ्या प्रमाणात तोडकाम करून इमारत धोकादायक स्थितीत गेल्याचे सांगितले आहे.

🚫 PMC चे नागरिकांना आवाहन
कारवाई झालेल्या या अनधिकृत इमारतींचा वापर करू नये, तसेच सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये, असे स्पष्ट आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे. भविष्यात अशा बांधकामांमध्ये राहणे अथवा खरेदी करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा PMC ने दिला.

⚠️ “अनधिकृत बांधकाम थांबवा; नागरिकांची फसवणूक करू नका” – PMC
PMC ने पुन्हा एकदा स्पष्ट केले की कोंढवा खुर्द, कोंढवा बु., शिवनेरी नगर, भग्यानगर, साईबाबा नगर या भागात पूर्वीही कारवाई झाली आहे. आता वारंवार नियम मोडून बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याची PMC ची प्रक्रिया सुरू झाली आहे.

PMC चा कडक इशारा :
“इलीगल बांधकाम तात्काळ थांबवा.”
“नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कठोर गुन्हे दाखल करणार.”
https://www.instagram.com/reel/DRPS-N5DB5m/?igsh=MXJmcTE3bDZoZHB3cA==
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
