Breaking NewsLatest NewsPCMCPMC News

पुणे शहरातील कोंडवा खुर्द शितल पेट्रोल पंपच्या मागे क्लासिक कुबा सोसायटीच्या शेजारी, जे.के. डेव्हलपर्स बिल्डर यांच्या बांधकाम प्रकल्पाबाबत धक्कादायक प्रकार उघड,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे शहरातील कोंडवा खुर्द शितल पेट्रोल पंपच्या मागे क्लासिक कुबा सोसायटीच्या शेजारी, जे.के. डेव्हलपर्स बिल्डर यांच्या बांधकाम प्रकल्पाबाबत धक्कादायक प्रकार उघड,

कोंडवा खुर्द येथे शितल पेट्रोल पंपच्या मागे, क्लासिक कुबा सोसायटीच्या शेजारी जे.के. डेव्हलपर्स (J.K. Developers) या प्रमोटर व बिल्डर कंपनीने पुणे महानगरपालिकेचा (PMC) कोणताही अधिकृत परवाना न घेताच बांधकाम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या जाहिरात फलकावर “PMC Sanctioned Project” असे छापून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

दरम्यान, JK Developers च्या नावावर दुसऱ्या एका व्यक्तीने बेकायदेशीर बांधकाम सुरू केले असल्याचा खुलासा समोर आला आहे. JK Developers कार्यालयाने PMC ला याबाबत खुलासा सादर केला असून, त्यांच्या नावाचा गैरवापर करून शेजारीच बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या प्रकरणाकडे Anti Corruption Squad Trust चे अध्यक्ष वाजिद खान यांनी लक्ष वेधले असून, त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला की, सदर प्रकल्पासाठी PMC कडून कोणतीही परवानगी मिळालेली नाही, तरीही PMC च्या मंजुरीचा दावा करून नागरिकांना चुकीची माहिती दिली जात आहे.

ही बाब अत्यंत गंभीर असून PMC च्या नियमांची सरळसरळ पायमल्ली आहे. दिशाभूल करणाऱ्या अशा जाहिरातींवर व बेकायदेशीर बांधकामावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून नागरिकांची फसवणूक थांबेल.

तपशीलवार माहिती व पुढील कारवाईसाठी नागरिकांनी PMC कडे तक्रार करावी, असे आवाहन ‘अँटी करप्शन स्क्वाड ट्रस्ट’कडून करण्यात आले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *