तरुणाचा निर्घृण खून करून फरार झालेले आरोपी नांदेडहून जेरबंद;आंबेगाव पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे | प्रतिनिधी
आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपींना आंबेगाव पोलिसांनी नांदेड येथून अटक करत मोठे यश मिळवले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास, नांदेड येथील रहिवासी जावेद पठाण (वय ३४ वर्षे) याचा खून करण्यात आला होता. जावेद हा आंबेगाव खुर्द येथील एका गारमेंट वॉशिंग सेंटरमध्ये काम करत होता. जुन्या वादातून आरोपींनी जावेदवर लोखंडी हत्याराने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान जावेदचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी नांदेडकडे पळून गेल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. नांदेड पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवून आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यात आला.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संदीप रंगराव भुरके (वय ३५) व ओमप्रसाद उर्फ दत्ता गणेश किरकन (वय २०) या दोन आरोपींना नांदेड येथून अटक केली. आरोपींना पुण्यात आणून पुढील तपास करण्यात येत असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही संपूर्ण कारवाई आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकाने अतिशय कौशल्यपूर्णरीत्या पार पाडली. नागरिकांकडून आंबेगाव पोलिसांच्या या तत्पर आणि धडाकेबाज कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
