ACBBreaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice News

राज्य उत्पादन शुल्क विभागाला हायकोर्टाचा दणका“2BHK डायनर अँड की क्लब”वरील कारवाईला स्थगिती,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे | राज्य उत्पादन शुल्क विभागाला हायकोर्टाचा दणका
“2BHK डायनर अँड की क्लब”वरील कारवाईला स्थगिती, तात्काळ सील हटवण्याचे आदेश,


पुणे : पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कथित मनमानी कारवाईला उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. शहरातील नामांकित 2BHK डायनर अँड की क्लबचा मद्यपरवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश Bombay High Courtने स्थगित केला असून, पबवरील सील तात्काळ हटवून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी शहरातील एकूण आठ पबवर नियमांचे उल्लंघन, वेळेनंतर पब सुरू ठेवणे व मद्यविक्री केल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कथित अनियमिततेचा ठपका ठेवत उत्पादन शुल्क विभागाने 2BHK डायनर अँड की क्लबचा परवाना १५ दिवसांसाठी रद्द करून पब सील केला होता.


मात्र, त्याच कारवाईत समाविष्ट असलेल्या इतर सात पबवर कोणतीही कारवाई न झाल्याने या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. “त्या पबला अभय कोणाचे?” असा सवालही उपस्थित केला जात होता. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या कारवाईविरोधात क्लबचे प्रमुख डॉ. हेरंब शेलके यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रल्हाद परांजपे यांनी जोरदार युक्तिवाद करत, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई एकतर्फी, अविचारी व अधिकारांचा गैरवापर करणारी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने याची दखल घेत मद्यपरवाना निलंबनाचा आदेश स्थगित केला.


या निर्णयामुळे 2BHK डायनर अँड की क्लब तात्काळ पुन्हा सुरू होणार आहे. “कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणतीही यंत्रणा कायद्यापेक्षा मोठी नाही,” हा संदेश या निकालातून ठळकपणे अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया ब्रँड ओनर डॉ. हेरंब शेलके यांनी व्यक्त केली. हा निकाल केवळ एका आस्थापनापुरता मर्यादित न राहता, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जबाबदारी, पारदर्शकता आणि अधिकारांच्या मर्यादांवरही बोट ठेवणारा ठरला आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *