Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsTraffice Police

रस्ता पेठ पॉवर हाऊससमोर फुटपाथवर दुचाकींचा कब्जा; नागरिक त्रस्त, समार्थ ट्रॅफिक विभागाचे दुर्लक्ष? ??? apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


पुणे : रस्ता पेठ येथील एमएसईबी पॉवर हाऊस कार्यालयाजवळ दुचाकी एजंटांनी फुटपाथवरच वाहनांची रांग लावल्याने नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात दुचाकी उभ्या केल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.


स्थानिक नागरिकांच्या मते, फुटपाथवर वाहन लावल्यास सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई केली जाते. मात्र येथे दुचाकी एजंटांकडून उघडपणे फुटपाथ अडवला जात असतानाही समार्थ ट्रॅफिक विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.


“सामान्यांवर कारवाई आणि एजंटांना मोकळीक का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. समार्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी व ट्रॅफिक विभागाचे संबंधित कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.


रस्ता पेठ पॉवर हाऊस परिसरातील ही समस्या तातडीने सोडवून फुटपाथ मोकळे करावेत व जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews?si=JQ2T1xU16aZHhKGT

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *