Breaking NewsLatest NewsPMC News

कोंढवा खुर्द,दुगड मध्यमिक विद्यालय जवळ,भाग्यदयनगरमध्ये बिनधास्त बेकायदेशीर बांधकाम – नागरिकांच्या जीवाशी खेळ!apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


पुण्यातील कोंढवा खुर्द, लेन क्रमांक 35, दुगड मध्यमिक विद्यालय जवळ,भाग्योदय नगर,कोंढवा, येथे एका बिल्डरकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम व मोठ्या प्रमाणावर गौणखनिज उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी खराडी परिसरात अतिक्रमण व अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, कोंढव्यात अद्यापही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे बेकायदेशीर काम खुलेआम सुरू आहे.
सदर बिल्डरने पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही,

तसेच तलाठी कार्यालयाचीही मंजुरी नसताना मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. बांधकामस्थळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत असून, परिसरातील रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.


धोक्याची बाब म्हणजे या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. एवढ्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघात किंवा जीवघेणी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. जर अशी घटना घडली, तर याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.


या प्रकरणात ANTI CORRUPTION SQUAD (ऑल इंडिया) चे अध्यक्ष वाजिद खान यांनी हस्तक्षेप करण्याचा इशारा दिला असून, संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करून दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.


आता प्रश्न असा आहे की, पुणे महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये कधी येणार? बेकायदेशीर बांधकाम आणि अवैध गौणखनिज उत्खननावर तात्काळ कारवाई होणार का, की एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार?नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित हस्तक्षेपाची जोरदार मागणी होत आहे.


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *