वाघोली रोड, पुणे – अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; 11 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मेफेड्रोन(MD) जप्त,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
वाघोली रोड, पुणे – अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; 11 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मेफेड्रोन जप्त,
वाघोली भागात अंमली पदार्थांची मोठी तस्करी उघडकीस आणत पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 02 आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मेफेड्रोन (एम.डी.) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. एकूण 11,90,000 रुपये किंमतीचा सुमारे 50 ग्रॅम 50 मिलीग्रॅम एम.डी. असा व्यावसायिक प्रमाणात (Commercial Quantity) साठा हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी C.R. No. 684/2025 असा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिनांक : 29/11/2025
वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिस अंमलदार संदीप देवकाते यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

मंञन कॉम्प्लेक्स, वाघोली रोड परिसरात संशयित इस्मा उर्फ धर्मीराज चौधरी (वय 27, रा. चिरायु हॉस्पिटलजवळ, केसनंद, वाघोली रोड, ता. हवेली, जि. पुणे / मूळ गाव – नायकडा, तह. जोधपूर, राजस्थान) याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे एम.डी.चा मोठा साठा आढळला.

पोलिसांनी अमली पदार्थासोबत इतर साहित्य जप्त करून आरोपीवर NDPS Act कलम 8(क), 21(क) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस संयुक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या संपूर्ण ऑपरेशनमध्ये निरीक्षक सुधर्शन गायकर सहाय्यक निरीक्षक नितीन नाईक उपनिरीक्षक अस्मिता लाड,

अंमलदार संदीप जाधव, दत्तात्रय खरपुडे, प्रथ्वीराज पांडुळे, संदीप देवकाते, देविदास सचदेव, महेश बोराडे, शुभम म्हाळकेर
यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी वाहाटोली परिसराचा वापर केला जात असल्याचा संशय असून, पोलिस तपास अधिक व्यापक पातळीवर सुरू आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
