ACBBreaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice News

कोंढवा खुर्द,काँग्रेसचा कार्यकर्ता (पारगे नगर) मध्ये बेकायदेशीर बांधकामाचा आरोप?apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे : कोंढवा खुर्द येथील पारगे नगर, सर्वे नंबर 38 मध्ये बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसचा कार्यकर्ता अल्ताफ शेख याने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बांधकाम सुरू केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकामासाठी पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच महसूल विभाग किंवा गौण खनिज (बांधकाम साहित्य) वापरासाठीही आवश्यक परवानगी न घेताच काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


याशिवाय, अल्ताफ शेख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हे बांधकाम सुरू ठेवल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकरणी पुणे महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे आणि लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अँटी करप्शन स्क्वॉड (भारत) चे ऑल इंडिया प्रेसिडेंट वाजिद खान हे या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून, संबंधित अधिकाऱ्यांकडे पुरावे सादर करून कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *