ACBBreaking NewsCrime NewsLatest NewsPMC News

सय्यद नगरमध्ये खळबळजनक प्रकार, नवजीवन नर्सिंग होम मध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप,?? सय्यद नगरमध्ये तणाव” apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ब्रेकिंग न्यूज | सय्यद नगरमध्ये खळबळजनक प्रकार
सय्यद नगर परिसरात नवजीवन हॉस्पिटलमधील एका गंभीर घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण पायाच्या दुखापतीवर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता.

मात्र, उपचारादरम्यान दिलेल्या इंजेक्शननंतर काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर सुमारे एक तासाने नातेवाईकांना मृत्यूची माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.


या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत, संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली आहे. “साध्या जखमेवर उपचारासाठी गेलेला व्यक्ती अचानक कसा मृत झाला?”

असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, संबंधित हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या ? काही वैद्यकीय सेवा सुरू असल्याच्या चर्चाही नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहेत.? ?त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *