ACBBreaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice News

पुणे मार्केट यार्डात जुगार-पत्ते क्लबचा उच्छाद; पोलिसांच्या आशिर्वादाने सुरू अवैध धंदे?apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे मार्केट यार्डात जुगार-पत्ते क्लबचा उच्छाद; पोलिसांच्या आशिर्वादाने सुरू अवैध धंदे?

पुणे | मार्केट यार्ड परिसरात अवैध व्यवसायांचे जाळे थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकताच एक नवीन जुगार आणि पत्ते क्लबचा व्हिडिओ समोर आला असून, हा क्लब मार्केट पोलीस ठाण्याच्या तथाकथित “वसुली बहादूर” च्या आशिर्वादाने सुरू असल्याची गंभीर चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

स्थानिक व्यापारी व नागरिकांनी असा आरोप केला आहे की, मार्केट यार्डात काही प्रभावशाली व्यक्तींच्या छत्रछायेखाली जुगार, मटका आणि इतर अवैध धंदे निर्धोकपणे सुरू आहेत. काही पोलिस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी डोळेझाक करत असल्याचे आरोपही होत आहेत.

या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून, “पुणे पोलीस आयुक्तांनी यावर तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अँटी करप्शन स्क्वाड ट्रस्टचे अध्यक्ष वाजिद खान यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की —
“मार्केट यार्डात दररोज रात्री पत्ते क्लब, मटका आणि इतर अवैध धंदे बिनधास्तपणे चालतात. हे सर्व थांबवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी स्वतः पुढाकार घ्यावा आणि जे अधिकारी गुन्हेगारांना संरक्षण देतात, त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी.”

स्थानिक नागरिकांनी असेही सांगितले की, “कायद्याचे रक्षकच जर कायदा मोडणाऱ्यांना संरक्षण देत असतील, तर सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होईल.”

नागरिकांचा प्रश्न:
“पुणे पोलीस आयुक्त या वसुली बहादूर आणि जुगार क्लबच्या रॅकेटवर आता तरी कारवाई करतील का?”

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *