पुणे कॅम्प भागात पुन्हा अवैध हातगाड्या व स्टॉल्स! नागरिकांचा संताप,पुणे कॅन्टोन्मेंट दुलक्ष,?apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे कॅम्प भागात पुन्हा अवैध हातगाड्या व स्टॉल्स! नागरिकांचा संताप
पुणे : कॅम्प परिसरातील शाचा पीर स्ट्रीट, मॉडर्न डेअरी चौक, तबूत स्ट्रीट चौक या भागात पुन्हा अवैध हातगाड्या आणि स्टॉल्स सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी लष्कर पोलिस ठाणे आणि पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड (PCB) अतिक्रमण विभागाने या ठिकाणी कारवाई केली होती. मात्र, काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा त्याच ठिकाणी हातगाड्या आणि स्टॉल्स उभ्या राहिल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांचा सवाल असा आहे की, हे अवैध व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? पुणे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिले होते की, “अतिक्रमण ज्या ठिकाणी दिसेल, त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्याने तात्काळ कारवाई करावी.” तरीदेखील लष्कर पोलिस ठाण्याने या प्रकरणात अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसते.

काही महिन्यांपूर्वी लष्कर पोलिसांनी येथे अवैध हातगाड्या व स्टॉल्सवर कारवाई केली होती, पण आता मात्र ते मौन बाळगत आहेत. नागरिकांमध्ये चर्चा आहे की, पोलिसांकडून आणि कॅन्टोनमेंट बोर्ड अतिक्रमण विभागाकडून कारवाई थांबविण्याचे राजकीय दबावामुळे आहे का??

या सर्व प्रकरणात पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड अतिक्रमण विभागाने देखील लक्ष देण्याची गरज आहे. कारण हे त्यांच्या जबाबदारीच्या हद्दीत येते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

📍 स्थान: शाचा पीर स्ट्रीट, मॉडर्न डेअरी चौक, तबूत स्ट्रीट चौक, कॅम्प,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
