हायवेला कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी हिंजवडी जाळयात ६ गुन्हे उघड. हिंजवडी पोलिस स्टेशनची गुन्हे शोध पथकाची कामगीरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

जबरी चोर्‍या करणार्‍यांचा पर्दाफाश 6 गुन्हयांची उकल हिंजवडी पोलिस स्टेशनची कारवाई.

हायवेला कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी हिंजवडी जाळयात ६ गुन्हे उघड. हिंजवडी पोलिस स्टेशनची गुन्हे शोध पथकाची कामगीरी.

हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड

पिंपरी दिनांक : २५/०४/२०२३ /:- (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

चांदणी चौकाच्या अलिकडील परिसरात कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी करणार्‍यांचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीच्या म्होरक्यासह दोन अल्पवयीन मुलांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्याकडून 6 गुन्हे उघडकीस आली आहे ( Chandani Chowk Pune) पोलिसांनी 1 लाख 18 हजार 700 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. रामदास बबन कचरे ( 22, रा. सोलमलोन, ता. महाड, जि. रायगड. सध्या रा. डोनजे गाव, ता. हवेली, जि पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

त्याच्या 2 अल्पवयीन साथीदारांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 1 एप्रिल 2023 रोजी सदरील गुन्हयातील फिर्यादी यश नागेश मळगे (30, रा. कोथरूड ) हे रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकाच्या अलिकडे असणार्‍या काचेच्या बिल्डींग शेजारील सर्व्हिस रोडवर (बावधन) येथे फोनवर बोलत उभे होते. त्यावेळी आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या खिशामील पैशाचे पाकीट काढून मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. आरोपीनीं त्यांच्याकडील मोटारसायकल देखील जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

हिंजवडी पोलिस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाने सलग 10 दिवस चांदणी चौक, बावधन ते लवासा (Bavdhan To Lavasa), पौड (Paud), खडकवासला (Khadakwasla) आणि इतर भागातील सुमारे 65 सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. त्यावेळी खडकवासला परिसरातील रेकॉर्डवरील (Criminals On Pune Police Records) आरोपी रामदास बबन कचरे याच्याशी मिळते-जुळते वर्णनाचे फुटेज असल्याचे पोलिसांना समजले. पोलिस पथकाने आरोपी रामदास कचरेचा माग काढण्यास सुरूवात केली. पोलिसांनी सिंहगड पायथा (Sinhgad Paytha), लवासा परिसर, मुठा गाव ताम्हीणी घाट परिसरात वेषांतर करून सापळा रचला मात्र आरोपींना चाहूल लागली आणि त्यांनी पलायन केले. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बंडु मारणे यांना आरोपी कचरे हा मुळशी तालुक्यातील माण येथील बापुजी बुवा मंदिर परिसरात असल्याची माहिती समजली. पोलिसांनी सापळा रचुन आरोपी रामदास कचरे आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत 3, पौड पोलिस स्टेशनच्या हद्दीत 2 आणि हवेली पोलिस स्टेशनच्या हद्दीत 1 असे एकुण 6 गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्हयातील चोरलेली मोटारसायकल, सोन्याची चैन, चोरलेले मोबाईल आणि गुन्हयात वापरलेली हत्यारे असा एकुण 1 लाख 18 हजार रूप्याचा ऐवज जप्त केला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. संजय शिंदे सो, पोलीस सहआयुक्त, मा. श्री वसंत परदेशी सो, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि. २. पिंपरी चिंचवड, मा. स्वप्ना गोरे पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, अतिरिक्त प्रभार पोलीस उप आयुक्त परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चि यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास कॅगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सुभाष गुरव, नरेश बलसाने, सागर पंडीत यांनी केली आहे.

( स्वप्ना गोरे) पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड अतिरिक्त प्रभार पोलीस उप-आयुक्त परि-२.पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *