पुणे महानगरपालिकेची कोंढवा परिसरात मोठी धडक कारवाई,अनधिकृत बांधकामांवर सुरू झाली PMC ची मोहीम,बिल्डरवर गुन्हे दाखल करण्याची तयारी,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे महानगरपालिकेची कोंढवा परिसरात मोठी धडक कारवाई ,
अनधिकृत बांधकामांवर सुरू झाली PMC ची मोहीम, गुन्हे दाखल करण्याची तयारी,

पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामार्फत आज दिनांक 06 नोव्हेंबर 2025 रोजी कोंढवा खुर्द, भाग्योदय नगर (सर्वे नं. 52, मक्का मशिदीजवळ) येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.,

या ठिकाणी B3 + 10 मजल्यांची इमारत बांधकाम सुरू असून, अंदाजे 15,000 चौ.फुट आरसीसी बांधकाम करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कोंढवा बुद्रुक परिसरातील सर्वे नं. 5 (भाग), लक्ष्मी नगर गल्ली नं. 1 येथे तळ मजला + 1 मजला (आरसीसी) तसेच गल्ली नं. 5 येथे प्लिंथवरही कारवाई करण्यात आली.

एकूण अंदाजे 18,500 चौ.फुट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाईदरम्यान:
- 6 बिगारी,
- 5 पोलीस कर्मचारी,
- 1 JCB मशीन,
- 4 ब्रेकर मशीन,
- 2 गॅस कटर,
- 5 कनिष्ठ अभियंता व
- 2 उपअभियंता उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या या कारवाईनंतर संबंधित बांधकाम धोकादायक स्थितीत आलेले असून, त्याचा वापर करणे अनुचित आहे.

📢 पुणे महानगरपालिकेचे आवाहन: नागरिकांनी अशा अनधिकृत इमारतींमध्ये सदनिका खरेदी करू नयेत व कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार टाळावेत.

🔴 आगामी कारवाईची दिशा:
पुणे महानगरपालिका आता कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, मिता नगर, अशरफी नगर व कोंढवा बुजुर्ग या परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करणार आहे.
PMC ने स्पष्ट केले आहे की अशा अवैध बांधकामांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून संबंधित बिल्डर व बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे की, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, आणि PMCच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या सर्व इमारतींवर सतत नजर ठेवून तोडफोडीची मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
