अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताची खोटी बातमी छापण्याची धमकी; डॉक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप???,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे | विश्रांतवाडी : अल्पवयीन मुलींचे बेकायदेशीर गर्भपात केल्याची खोटी बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याची तसेच दवाखाना बंद पाडण्याची धमकी देत ६१ वर्षीय स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन कथित तोतया पत्रकारांविरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रणव ऊर्फ प्रसाद बोरसे (२५) आणि शुभम सौदागर (२६), दोघेही रा. विश्रांतवाडी, यांनी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलींचे गर्भपात केले जात असल्याची खोटी माहिती पसरवून ती वर्तमानपत्रात छापण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातून सुटका करून देण्यासाठी तसेच डॉक्टरांना या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत आरोपींनी १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री टिंगरेनगर येथील एका हॉटेलमध्ये घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी विमाननगर परिसरातील ६१ वर्षीय स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आरोपींनी स्वतःला पत्रकार म्हणून ओळख दिली होती का आणि त्यांच्याकडे कोणत्याही माध्यम संस्थेचे अधिकृत ओळखपत्र किंवा नियुक्ती होती का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

टीप : या प्रकरणातील आरोपींवरील आरोप तपासाधीन असून, न्यायालयीन निर्णय होईपर्यंत त्यांना दोषी ठरवता येणार नाही.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
