कॅम्पमध्ये गार्डन वडा-पाव स्टॉलमुळे वाहतूक कोंडी; कारवाईचा अभाव?apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे कॅम्प परिसरात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाकडून साईट मार्जिनवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली.

मात्र, दुसरीकडे कॅम्प परिसरातील गार्डन वडा-पाव विक्रेत्याची मनमानी सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. फुटपाथवर हातगाडी लावून व्यवसाय सुरू असून, प्रशासन आणि पोलीस विभागाचा कोणताही धाक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कॅम्प परिसरातील गार्डन वडा-पाव स्टॉल फुटपाथवर हातगाडी लावून सुरू असल्याने परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्टॉलमुळे पादचारी आणि वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून, लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस व प्रशासनाकडून कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
तसेच एम.जी. रोडवरील अरोरा टॉवरजवळ युनियन बँक आणि साऊथ इंडियन बँकेच्या परिसरात, विशेषतः युनियन बँकेसमोर फुटपाथवर हातगाड्या व स्टॉल लावण्यात आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या अतिक्रमणामुळे पादचारी तसेच वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊन भविष्यात अपघात किंवा चोरीसारखी घटना घडण्याची शक्यता असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पुणे पोलीस आयुक्तांनी आपल्या अधिकारक्षेत्रानुसार अनधिकृत हातगाड्या व फुटपाथवरील अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जाते. मग लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

अपघात किंवा अनुचित घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? अशा घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न सध्या कॅम्प परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.आता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अतिक्रमण विभाग आणि लष्कर पोलीस स्टेशन या अनधिकृत हातगाड्यांवर प्रत्यक्ष कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
फुटपाथ अतिक्रमणावर कारवाई कधी होणार? असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
