पुणे:भवानी पेठ,: चुदामण तलिम–पुणे कॉलेज रोड परिसरात भीषण वाहतूक कोंडी;रस्त्याचे कामामुळे नागरिक त्रस्त,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे:भवानी पेठ,:चुदामण तलिम–पुणे कॉलेज रोड परिसरात भीषण वाहतूक कोंडी;रस्त्याचे कामामुळे नागरिक त्रस्त,
भवानी पेठ येथील चुदामण तलिम ते पुणे कॉलेज रोड परिसर गेल्या काही दिवसांपासून भीषण वाहतूक कोंडीचा सामना करत आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाही कॉन्ट्रॅक्टरची निष्काळजीपणा, पुणे महापालिकेचा हलगर्जी कारभार आणि समर्थ पोलीस स्टेशन तसेच ट्रॅफिक विभागाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

रस्त्याचे काम रखडले – दररोज वाहतूक ठप्प
या गर्दीच्या परिसरात रस्त्याचे काम सुरू असले तरी ते अत्यंत संथ गतीने चालू आहे.काम सुरू असूनही योग्य डायवर्जन, बॅरिकेडिंग किंवा वाहतूक व्यवस्थापन केले नसल्याने ऑटो रिक्षा, दुचाकी, चारचाकी आणि पादचारी सर्वच अडचणीत आले आहेत.

मेडिकल लॅबकडे जाणाऱ्या रुग्णांना मोठी गैरसोय,
या रस्त्यावरच एक मेडिकल लॅब असल्याने आजारी रुग्णांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीमुळे अतिआवश्यक तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे.

परिसरातच कॉलेज आणि शाळा – विद्यार्थी अडचणीत
या भागात कॉलेज आणि शाळा असल्याने सकाळ–संध्याकाळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते.वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्यामुळे ,शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना धोका,पालकांना मुलांना सोडणे–आणणे कठीण/रिक्षाच्या रांगा वाढत आहेत प्रशासनाचे दुर्लक्ष – नागरिक संतापले,नागरिकांच्या repeated तक्रारी असूनही,महापालिकेचे अभियंते रस्ता दुरुस्ती करणारा कॉन्ट्रॅक्टर,समर्थ पोलीस ट्रॅफिक विभाग,यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.नियमित वाहतूक निरीक्षण नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे.

नागरिकांची मागणी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे,पर्यायी मार्गांचे योग्य नियोजन करावे,ट्रॅफिक पोलीस तैनात करावेत,विद्यार्थ्यांसाठी व रुग्णांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करावा,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
