कोंढवा खुर्दमध्ये बिल्डरची मनमानी! बेकायदेशीर उत्खनन व बांधकाम सुरू;कोंढवा खुर्द परिसरातील KAUSAR BAUGH, City Survey No. 716 व 718,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

कोंढवा खुर्दमध्ये बिल्डरची मनमानी! बेकायदेशीर उत्खनन व बांधकाम सुरू; महापालिकेच्या महसूल खात्याला फसवणूक,
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे | कोंढवा खुर्द – कोंढवा खुर्द परिसरातील KAUSAR BAUGH, City Survey No. 716 व 718 लगत एका बिल्डरने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीर उत्खनन, खड्डे खोदणे व बांधकामाचे काम सर्रास सुरू केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित बिल्डरने ना तलाठी कार्यालयाची परवानगी घेतली आहे, ना पुणे महानगरपालिका (PMC) कडून कोणताही अधिकृत बांधकाम अथवा उत्खनन परवाना घेतलेला आहे.

सदर ठिकाणी अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर मुरूम, माती व दगडांचे उत्खनन करण्यात येत असून, महसूल खात्याचा मसूल (चलन) न भरता काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून, महापालिका व शासन यंत्रणेची थेट फसवणूक होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
ही बेकायदेशीर कामे Darus Salaam Apartment (City Survey No. 716 & 718), KAUSAR BAUGH, कोंढवा खुर्द, पुणे – 411048 यांच्या शेजारी सुरू असून, याच परिसरात Olive Hospital देखील आहे. रुग्णालय व रहिवासी इमारतीच्या अगदी बाजूलाच सुरू असलेल्या या उत्खननामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित बिल्डर महसूल खात्याचा मसूल न भरता, नियमांना बगल देत बिनधास्तपणे काम करत आहे. तसेच शासनाचे नियम, पर्यावरणीय अटी व बांधकाम कायदे पायदळी तुडवत प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.
या प्रकरणात कोंढवा खुर्द येथील नागरिकांनी महापालिका, महसूल विभाग व संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, बेकायदेशीर उत्खनन थांबवावे आणि दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
प्रश्न असा आहे की, एवढ्या उघडपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर कामांकडे प्रशासन कधी लक्ष देणार? आणि या बिल्डरच्या मनमानीला लगाम कधी बसणार?

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
