कोंढवा-कौसरबाग प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीत राजकीय भूकंप! काशिफ सय्यद यांचा राजीनामा;apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंढवा-कौसरबाग प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीत राजकीय भूकंप! काशिफ सय्यद यांचा राजीनामा; पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा निर्णय कारणीभूत,

पुणे | प्रतिनिधी
कोंढवा खुर्द–कौसरबाग परिसरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांच्यात युती झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
या युतीच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत काशिफ सय्यद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

काशिफ सय्यद यांनी दिलेल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, “प्रभाग १९ कोंढवा–कौसरबागमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांची युती ही कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्थानिक राजकीय वास्तवाशी विसंगत आहे.” या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
विशेष म्हणजे, याच मुद्द्यावर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर पुणे शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही राजीनामे देत समर्थन दर्शवले आहे.
पक्षातील अंतर्गत मतभेद, गटबाजी आणि स्थानिक पातळीवरील युतीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कोंढवा-कौसरबाग प्रभाग १९ मधील घडामोडींमुळे पुणे शहराच्या राजकारणात नवे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या राजीनाम्यांनंतर पक्ष नेतृत्वाची पुढील भूमिका काय असणार, तसेच नाराज कार्यकर्त्यांना मनवण्यात यश येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
