हडपसरमध्ये बेकायदेशीर होर्डिंग्सचा सुळसुळाट; नागरिकांच्या जीविताला धोका??apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
हडपसर परिसरात रस्त्यावर व थेट फुटपाथवर अतिक्रमण करून मोठ्या लोखंडी होर्डिंग्स उभारल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आवश्यक परवानग्या नसतानाही या होर्डिंग्स निर्धास्तपणे उभ्या केल्या जात आहेत. याबाबत हडपसर वॉर्ड अधिकारी आकाश छिन्ना यांच्या निष्काळजीपणाकडे नागरिकांनी बोट दाखवले आहे.

यापूर्वी पुणे स्टेशन परिसरात होर्डिंग कोसळून निष्पाप नागरिकांचे प्राण गेले होते. त्या घटनेनंतर महापालिका यंत्रणा काही काळ सक्रिय झाली होती. मात्र सध्या पुन्हा एकदा बेकायदेशीर होर्डिंग्स “बिंदास”पणे उभारल्या जात असल्याचे चित्र आहे. एखादी होर्डिंग कोसळून अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा धोकादायक होर्डिंग्समुळे वाहतूक अडथळे, पादचाऱ्यांना धोका आणि जीवितहानीचा धोका वाढत आहे. तरीही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही.
आता प्रश्न असा आहे की, पुणे महानगरपालिका यंत्रणा केवळ अपघात झाल्यानंतरच जागी होणार का? की वेळेत कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार? हडपसरमधील बेकायदेशीर होर्डिंग्स तात्काळ हटवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
