Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice News

बिबवेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई – जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे तीन आरोपी अटकेत,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

बिबवेवाडी पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. या घटनेमुळे सुखसागरनगर परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेचा तपशील,
दि. २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सुखसागरनगर, कात्रज येथील महाराणी साडी दुकानाजवळ तीन अनोळखी इसम पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या अ‍ॅक्टीव्हा दुचाकीवरून आले. तिघांनी डोक्यावर कॅप घातली होती.
फिर्यादी सोमसिंह मानसिंह जोधा राठोड (वय ४३, व्यवसाय – सराफ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या भावावर भरतसिंह मानसिंह जोधा राठोड (वय ४१) यांच्यावर दोन आरोपींनी धारदार शस्त्राने डोक्यावर व दोन्ही हातांवर वार केले, तर तिसऱ्या आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मदतीला धावून आलेल्या नागरिकांना शस्त्र हवेत फिरवत “मध्ये आलात तर तुम्हालाही मारून टाकू” अशी धमकी देत आरोपींनी दहशत निर्माण केली. जाताना दुकानावर दगडफेकही करण्यात आली.


या प्रकरणी गुन्हा रजि. नं. १३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०९(१), ३५१(४), ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


तपास आणि अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला.
अटक करण्यात आलेले आरोपी,1)
1) अभिषेक तुळजाराम क्षीरसागर (वय २१)
2) ओंकार अनिल शिंदे (वय २३)
3) आशीष रमेश शिंदे (वय २०)
तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना प्रथम पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी त्यांना येरवडा केंद्रीय कारागृह येथे रवाना करण्यात आले आहे.या गुन्ह्यातील उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी सांगितले की, “कायद्याचा धाक निर्माण ठेवण्यासाठी अशा गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *