Breaking NewsLatest NewsPMC News

कोंढवा खुर्दमध्ये संशयास्पद रस्ता काम? बाळाजी ट्रेडर्ससमोर डांबरीकरण; PMC अधिकाऱ्यांवर संगनमताचा आरोपपुणे :apcs in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

कोंढवा खुर्द परिसरातील अशोका म्युझिकजवळ बाळाजी ट्रेडर्स या दुकानासमोर अचानक डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून, यावरून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.,

संबंधित काम हे पुणे महानगरपालिकेच्या नियमित खड्डे बुजवण्याच्या मोहिमेअंतर्गत नसून, एका व्यावसायिक दुकानासमोर प्राधान्याने करण्यात आल्याचा आरोप होत आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, पुणे महानगरपालिकेची वाहने शहरातील विविध भागांत खड्डे बुजवण्याचे काम करीत असताना, कोंढवा खुर्दमधील अनेक भागांमध्ये गंभीर खड्डे कायम आहेत.

मात्र बाळाजी ट्रेडर्ससमोरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करून देण्यात आला. यामागे संबंधित अधिकाऱ्यांनी दुकानदाराशी संगनमत करून आर्थिक व्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मेठा नगर, भाग्योदय नगर, शिवनेरी नगर, ४२ नंबर परिसर, नवाजी चौक, साईबाबा नगर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असून नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण कोंढवा परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था असताना, निवडक ठिकाणीच कामे होत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पैशांच्या जोरावर कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *