पुणे कॅम्पमध्ये ‘गार्डन वडा पाव’ पुन्हा सुरू;फुटपाथ अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त,पोलीस आयुक्तांनी बेकायदेशीर हॉकर्सवर कठोर कारवाई करावी,
ACS POLICE CREAM SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे : पुणे कॅम्प परिसरात पुन्हा एकदा ‘गार्डन वडा पाव’चा व्यवसाय सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. फुटपाथवर हातगाडी लावून सुरू असलेल्या या व्यवसायामुळे रस्त्यावर दुहेरी पार्किंगची समस्या निर्माण होत असून पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विक्रेत्याला कोणत्याही कायद्याची भीती नसून तो बिनधास्तपणे फुटपाथवर गाडी लावून व्यवसाय करत आहे. यापूर्वी लष्कर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कारवाई केल्यानंतर काही काळासाठी हा व्यवसाय बंद करण्यात आला होता. मात्र, सध्या नवीन वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर पुन्हा हा व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, आपल्या अधिकारानुसार फुटपाथवरील अतिक्रमण व बेकायदेशीर हॉकर्सवर कठोर कारवाई करावी. मात्र, या सूचनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या कॅम्प परिसरात पाहायला मिळत आहे.

नागरिकांचा प्रश्न असा आहे की, कायदा फक्त सामान्य आणि गरीब लोकांसाठीच आहे का? बेकायदेशीरपणे फुटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.स्थानिकांनी प्रशासन आणि पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करून फुटपाथ मोकळे करावेत व वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी, अशी मागणी केली आहे.

