Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC News

कोंढवा खुर्दमध्ये बिल्डरची मनमानी; महापालिकेच्या कारवाईनंतरही सर्व्हे नंबर ४२ पुन्हा बांधकाम सुरू,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


पुणे : कोंढवा खुर्द परिसरातील सर्व्हे नंबर ४२ येथे एका बिल्डरकडून नियमांना धाब्यावर बसवून पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेने यापूर्वी संबंधित बांधकामावर कारवाई केली होती. मात्र त्यानंतरही बिल्डरने कोणतीही भीती न बाळगता पुन्हा काम सुरू केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, महापालिकेच्या कारवाईनंतरही बांधकाम सुरू राहणे म्हणजे प्रशासनाच्या आदेशालाच आव्हान देण्यासारखे आहे. अरुंद रस्ता, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि बांधकाम नियमांचे उल्लंघन यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.या प्रकरणात संबंधित बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल करून सर्वात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पुन्हा सुरू झालेले बांधकाम तात्काळ बंद करून महापालिकेने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.


सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले असून, “महापालिकेने आधी कारवाई करूनही पुन्हा काम सुरू कसे झाले? प्रशासनाचे या बांधकामाला आशिर्वाद आहेत का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
आता पुणे महानगरपालिका या प्रकरणात पुन्हा कारवाई करणार का, की संबंधित बिल्डरवर मेहरबानी दाखवली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *