ACBBreaking NewsCrime NewsLatest NewsPolice News

मुंबई उच्च न्यायालयाकडून पुणे पोलिसांच्या गनमॅन शैलेश जगताप यांना दिलासा; फौजदारी कारवाईला अंतरिम स्थगिती,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे | मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल तथा गनमॅन शैलेश जगताप यांना मोठा दिलासा देत त्यांच्या विरोधातील एस.टी.सी. क्र. ४३२३६/२०१६ या खासगी फौजदारी तक्रारीतील संपूर्ण कार्यवाही आणि त्यावरील सर्व आदेश रद्द (Quashed and Set Aside) केले आहेत. न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी हा आदेश दिला.

यापूर्वी जगताप यांच्यावर नाना पेठ येथील एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याचा तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवरून त्यांच्याविरोधात खासगी फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती.

शैलेश जगताप हे पुणे पोलिस दलातील धाडसी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. अवैध शस्त्रसाठा जप्त करणे आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी त्यांची विशेष ख्याती होती. त्यांच्या धाडसी कारवायांमुळे अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण झाला होता. त्यामुळे ते गुन्हेगारीविरोधातील प्रभावी अधिकारी म्हणून ओळखले जात होते.

मात्र, न्यायालयाने प्राथमिक सुनावणीत तक्रारदार राहुल खेत्रे यांनी चौकशीदरम्यान दिलेले जबाब आणि नंतर दाखल केलेल्या तक्रारीतील मजकूर यामध्ये विसंगती असल्याची नोंद घेतली. तसेच तक्रारीच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित करत पुढील फौजदारी कार्यवाहीला अंतरिम स्थगिती दिली.

मात्र, न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर संबंधित तक्रारीतील कार्यवाही आणि त्याअनुषंगाने पारित झालेले आदेश रद्द केले. त्यामुळे शैलेश जगताप यांच्याविरोधातील हे फौजदारी प्रकरण न्यायालयाने समाप्त केले आहे.

याचिकेमध्ये जगताप यांनी आपल्याविरुद्ध खोटे आरोप करून गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला होता. त्यांच्या वकिलांनी सेवाकाळातील उत्कृष्ट कामगिरी, प्राप्त सन्मान आणि तक्रारदाराविरोधातील गुन्ह्यांची माहिती न्यायालयासमोर मांडली होती.


शैलेश जगताप हे पुणे पोलिस दलातील धाडसी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. अवैध शस्त्रसाठा जप्त करणे आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी त्यांची विशेष ख्याती होती. त्यांच्या धाडसी कारवायांमुळे अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण झाला होता. त्यामुळे ते गुन्हेगारीविरोधातील प्रभावी अधिकारी म्हणून ओळखले जात होते.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *