अंमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध; हप्ता वसुली करणारा पोलीस अंमलदार सेवेतून बडतर्फ,स्वारगेट पोलीस ठाण्यात नेमणूकीला होते.apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे : प्रतिनिधी :
पुणे पोलिसांनी पोलीस दलातील भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांना मिळणाऱ्या पाठबळाविरोधात कठोर भूमिका घेत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत असताना अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणे, अंमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध ठेवणे आणि त्यांच्याकडून नियमित हप्ता वसूल केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार नवनाथ कांताराम शिंदे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
विभागीय चौकशीत नवनाथ शिंदे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे चालविणाऱ्यांशी संपर्क ठेवून आर्थिक लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये अवैध धंदे चालविणाऱ्यांचे संपर्क क्रमांक आढळून आले. साक्षीदारांच्या जबाबांमधूनही ते नियमित हप्ता वसूल करत असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी सुरुवातीला त्यांना निलंबित करण्यात आले होते.

पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे,
त्यानंतर झालेल्या विभागीय चौकशीत दोष सिद्ध झाल्याने पोलीस उपायुक्तांनी बडतर्फीची शिफारस केली. सर्व अहवालांचा आढावा घेत अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी नवनाथ शिंदे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या अडीच वर्षांपासून अंमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवली असून, अशा कारवायांमधून अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
