जामिनदाराच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस दलातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
Pune Crime | जामिनदाराच्या आत्महत्येप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल.
पुणे : Pune Crime | कर्जदाराने हप्ते थकविल्याने त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दबाव आणून अटक करण्याची भिती दाखविली. या त्रासाला कंटाळून जामिनदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघा पोलीस कर्मचार्यासह कर्जदारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
किरण भातलावंडे (रा. गवळी वस्ती, मांजरी) आणि सहायक पोलीस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम व पोलीस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे नेमणूक समर्थ पोलीस ठाणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
राजेंद्र राऊत असे आत्महत्या केलेल्या जामीनदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची कन्या वैष्णवी राजेंद्र राऊत (वय २३, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६४/२२) दिली आहे. ही घटना नाना पेठेतील राऊत यांच्या घरी सोमवारी सकाळी ६ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण भातलावंडे हा फिर्यादी यांचे वडिल राजेंद्र राऊत यांच्या मित्र होता.
किरण याने रघुवीर बिजनेस प्रा. लि. हैदराबाद यांच्याकडून टाटा सुमो विक्टा ही गाडी घेतली होती.
त्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी राजेंद्र राऊत हे जामीनदार होते.
परंतु किरण याने कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे सहायक पोलीस फौजदार भाग्यवान निकम व हवालदार सचिन बरकडे हे राजेंद्र राऊत यांच्याकडे वारंवार कोर्टाचे वॉरंट बजावण्यासाठी येत होते.
ते त्यांना अटक करण्याची भिती दाखवत होते.
अटक होऊ नये, या भितीने त्यांनी वेळोवेळी ७ ते ८ हजार रुपये दिले होते.
या सर्व त्रासामुळे राऊत यांनी किरण याला कर्ज फेडण्यास सांगितले.
तेव्हा किरण याने कर्ज फेडण्यास नकार देऊन धमकी दिली. या त्रासाला कंटाळून राजेंद्र राऊत यांनी सोमवारी सकाळी
६ वाजता घराबाहेरील पॅसेजमध्ये नायलॉनचे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे
व अन्य अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad