सरडेवाडी टोल नाका (इंदापूर) येथे “लाल-काळा-पिला” जुगाराचा जोर?apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
सरडेवाडी टोल नाका (इंदापूर) परिसरात अवैध जुगाराचा धंदा?
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाका परिसरात तीन पत्ती (जुगार)चा अवैध धंदा सुरू असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार विशेषतः शनिवार आणि रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात चालतो.
मिळालेल्या माहितीनुसार, टोल नाक्याजवळ उघडपणे “लाल-काळा पद्धतीने जुगार खेळवला जात असून, काही ठिकाणी “जुगाड” पद्धतीने हा धंदा चालवला जात असल्याचा आरोप आहे.

यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.स्थानिकांनी पोलिसांवरही दुर्लक्ष केल्याचा आरोप केला असून, वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारचे अवैध व्यवहार टोल नाक्यांजवळ सुरू असल्याच्या घटना इतर ठिकाणीही समोर आल्या असून, काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे,

नागरिकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, इतक्या बिनधास्तपणे हा जुगार सुरू असताना तो नेमका कोणाच्या आशिर्वादाने चालतो आहे? काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांचे दुर्लक्ष किंवा संभाव्य मूक संमती असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, या बाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
