विमानतळ पोलीस स्टेशन कडुन माथाडी कामाचे नावाखाली खंडणी उकळणा-या गुन्हेगारांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
पुणे, दि. ता. १४/०२/२०२३.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
विमानतळ पोलीस स्टेशन कडुन माथाडी कामाचे नावाखाली खंडणी उकळणा-या गुन्हेगारांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई.
रवी ससाणेच्या आर्थिक व्यवहाराची व मालमत्तेची चौकशी होणार!
कोट्यावधी रुपये खंडणीतून वसुली केल्याचा अंदाजपोलीस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का कारवाई.
विमानतळ पोलीस स्टेशन कडुन फिनिक्स मॉल येथील व्यापा-यांकडुन माथाडी कामाचे नावाखाली खंडणी उकळणा-या गुन्हेगारांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई “
विमानतळ हद्दीतील फिनिक्स मॉल येथील व्यावसायिकांना माथाडीच्या नावाखाली धमकावून खंडणी वसूल करणारा सराईत रविंद्र ससाणे याच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आठ दिवसात सलग तीन खंडणीचे गुन्हे रवि ससाणे याच्यावर दाखल करण्यात आले होते. गुन्हेगारी टोळीचे वर्चस्वातून गंभीर गुन्हे करत ससाणे टोळीने जनतेमध्ये दहशत निर्माण केली होती.
यावेळी टोळी प्रमुख १) रविंद्र जयप्रकाश ससाणे, वय ४९ वर्षे, रा. कल्लापुरे कॉलनी, खुळेवाडी, हनुमान मंदीर शेजारी, विमाननगर २) मंगल रमेश सातपुते वय अंदाजे ४० वर्षे, रा. धानोरी विश्रांतवाडी पुणे. ३) दिपक संपत गायकवाड वय अंदाजे ४० वर्षे, सर्व राह- मुळा रोड, खडकी येरवडा, पुणे यांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी उद्योजक व व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर बेकायदेशीर माथाडी वसुलीबाबत कडक उपाय योजना राबविण्याचे आदेश दिले होते. यावरून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने प्रताप मानकर यांच्या नेतृत्वाखाली धडाकेबाज कामगिरी करून रवि ससाणे विरुद्ध पहिली कारवाई केली होती. यानंतर विमानतळ पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या नेतृत्वाखाली डॅशिग कारवाई करत ससाने विरुद्ध सलग तीन गुन्हे दाखल केले होते.
विमानतळ पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी पोलीस उप आयुक्त परीमंडळ ०४ पुणे शहर शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग पणे शहर रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यावेळी खंडणी विरोधी पथक- २ वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी उद्योजक व व्यावसायिक यांना आवाहन केले आहे की, निर्भयपणे माथाडी विरोधी तक्रारीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार करावी. पुणे पोलीस व्यावसायिक व उद्योजकांना निर्भय वातावरण देण्यासाठी कटीबद्ध आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर विलास सोंडे पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, पोलीस उप निरीक्षक एस. एस. कोळ्ळुरे व सर्व्हेलन्स पथकातील पोलीस हवालदार उमेश धेंडे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस शिपाई तोडेकर, पोलीस शिपाई वाघुले, महिला पोलीस शिपाई भोर यांनी केली आहे..
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad