हडपसर पोलीस स्टेशनची कामगिरी. मांजरी फार्म परिसरातील महिलेचा अज्ञाताने केलेला खुनाचा गुन्हा हडपसर पोलीसांकडून दोन दिवसात उघड.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर.

दिनांक २८/०४/२०२३ (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

पुण्यात सोमवारी खुनाच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. शहरातील खडकी आणि कोंढवा पोलीस स्टेशनच्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनही खुनाची घटना उघडकीस आली आहे. मांजरी बुद्रुक परिसरात शेतमजूर महिलेचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्यानंतर तिचा मृतदेह विहीरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेतातील कामगार महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह विहीरीत टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

दिनांक २४/०४/२०२३ रोजी सायंकाळी १८/०० वा.चे सुमारास नियंत्रण कक्ष पुणे येथून झगडे वस्ती, कुरण फार्म, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेत एका महिलेची बॉडी पडली आहे असा कॉल प्राप्त झाल्याने, सदर ठिकाणी अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वार डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी विजय कुमार शिंदे सपोनि., प्रताप शेळके, पोउपनिरी, व अंमलदार असे घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी एका ५० वर्षीय महिलेची बॉडी ही विहरीमध्ये मिळून आली. मयताच्या डोक्यात अज्ञात इसमाने डोक्यात धारधार हत्याराने आणि कठीण हत्याराने घाव घालून तिचे प्रेत विहरीत टाकले. अधिक माहीती घेता मयताचे नाव उषा अशोक देशमुख वय ५० वर्ष रा. माळवाडी, कवडीपाट, लोणिकाळभोर, पुणे असे समजले सदर महिला शेळीपालन करीत होती. हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ६२३ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, मा. श्री. बजरंग देसाई साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे यांनी देखील भेट दिली होती व गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मांजरी फार्म येथील १०० एकर जागेत निर्जन स्थळी खजीना विहीर मध्ये महिलेची बॉडी मिळून आली. सदर महिलेस १०० ते १२५ फुट अंतरावरून मारून फरफटून ओढून विहीरीमध्ये टाकल्याचे दिसून येत होते. सीसीटीव्ही फटेज वा इतर कोणताही उपयुक्त पुरावा घटनास्थळी नव्हता. घटनास्थळ ग्रामिण भागातील असल्याने हडपसर तपास पथकाने दोन दिवस गरूड वस्ती, झगडे वस्ती, कदमवाक वस्ती, कवडीमाळवाडी, कवडीपाट, मांजरी बद्रुक, शेवाळवाडी भागात फिरून आरोपीविषयी माहीती घेण्याचा प्रयत्न केला. तपासपथकास महतप्रयासाने कवडी माळवाडी मधिल एक व्यक्ती घटनाझाल्यापासून गायब असल्याची माहीती मिळाली. अधिक माहीती घेता सदर व्यक्ती ४-५ दिवसापुर्वीच जेल मधून सुटला असल्याची माहीती मिळाली. तपासपथकातील अंमलदार समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार यांना गोपनीय माहीती मिळाली की, संशयीत हा फुरसुंगी भागात एका बिहारी इसमाकडे पेंटीगचे कामाकरीता गेला आहे. त्याचेवर लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. मिळालेली माहीती व तांत्रिक विश्लेषण याचे आधारे आरोपी नामे राजेश अशोक मुळेकर रा. कवडीपाट माळवाडी, हनुमान मंदिराशेजारी, लोणीकाळभोर, ता.हवेली जि. पुणे. यास दिनांक २६/०४/२०२३ रोजी सायंकाळी हडपसर गाव, कॅनोल भाग जवळील पान शॉप येथून ताब्यात घेवून त्यास हडपसर पोलीस स्टेशन येथे आणून त्याचेकडे तपास करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपी राजेश मुळेकर याचेकडे तपास करता त्याने सांगीतले की, दिनांक २४/०४ / २०२३ रोजी दुपारी ३.०० वा. चे सुमारास तो महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मांजरी फार्म येथील जागेत असणारी खजाना विहरीवर बसवलेली पाण्याची मोटार चोरण्यासाठी आला होता. मोटार चोरत असताना मयत महिला ही शेळ्या घेवून जात होती, तेंव्हा मयताने अरोपीस विहीरीवर मोटार चोरत असताना पाहीले आणि मी मी तुझ्याबाबत येथील अधिकारी यांना सांगते असे बोलून निघून जात होती. तेंव्हा आपले नाव सगळ्यांना समजेन व पुन्हा जेल मध्ये जावे लागेल या विचाराने आरोपीने तेथे पडलेली सिमेंटची (विट) ब्लॉक तिच्या डोक्यात पाठीगून मारली व जमिनीवर पडल्यावर मयताजवळील कोयत्याने डोक्यात वार केले आणी फरफटत आणून विहरीत ढकलून दिले होते. सदर गुन्ह्याचा तपास, विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

निर्जनस्थळी अज्ञात आरोपीने केलेल्या खुनामध्ये कोणताही पुरावा नसताना पोलीसांनी अतिशय कौशल्याने आणि अथक परिश्रम करून हडपसर तपासपथकाने महिलेच्या खुनाचा गुन्हा दोन दिवसात उघड केला.

सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कणिक, मा. सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुळे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. दिगंबर शिंदे साो, पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगळे सो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, अजित मदने, रशिद शेख, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *