साताऱ्यातील फरार सराईत गुंड पिस्टल विक्रीसाठी पुण्यात आला अन

साताऱ्यातील फरार सराईत गुंड पिस्टल विक्रीसाठी पुण्यात आला अन
Oct 5, 2020
पुणे : – साताऱ्यातून फरार असलेला एक सराईत गुन्हेगार पिस्टल विक्रीसाठी पुणे शहरात आला असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला अटक केली. मयूर महादेव साळुंखे (वय 30) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिस कर्मचारी गस्त घालीत असताना पोलीस नाईक शंकर कुंभार यांना वरील आरोपी पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी आंबेगाव बुद्रुक परिसरातील गायमुख चौकात सापळा रचला. त्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी आलेला एक इसम संशयास्पद रित्या हालचाल करताना दिसला. पोलिसांनी त्याला हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पोलिसांनी पाटणा करून त्याला ताब्यात घेते आणि अंग झडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन काडतुसे सापडली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील एका पुण्यात तो फरार आहे. याशिवाय त्याच्यावर खून, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील करीत आहेत.