आदरणीय सर, जयहिंद

 आज रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा , पुणे शहर कडील *सहा.पो.निरीक्षक विवेक पाडवी,पोउनि गुंगा जगताप,सपोफौ उदय काळभोर पो.हवा.राजेश अभंगे,दिनकर लोखंडे,राजेश लोखंडे,विनायक रामाणे, शकिर खान, पो.ना. दत्तात्रय खरपुडे, पो.ना.गणेश लोखंडे, पो.ना.शिवाजी जाधव, पो.शि.अमोल सरतापे** असे पाहिजे/फरारी/मोका/तडीपार व इतर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी, वाहनचोर यांचा शोध घेण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना *पो.हवा राजेश लोखंडे व पो.ना.गणेश लोखंडे* यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वाहनचोरीचे गुन्हे करणारा गुन्हेगार हा खडकी कॅन्टोनमेंट ऑफिस च्या मागे सेंट जोसेफ हायस्कूलच्या जवळ खडकी पुणे येथे चोरीची रिक्षा बाळगुन आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती आम्हाला फोन द्वारे कळवली असता आम्ही कारवाई करण्याबाबत योग्य त्या सुचना दिल्याने सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने दोन टीम बनवुन सापळा रचून सदर संशयित इसमास अत्यंत शिताफीने रिक्षासह पकडले व त्यास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव यश धर्मेश कांबळे, वय १९ वर्ष रा.लुम्बिंनी कुंज बुद्ध विहाराजवळ,खडकी बाजार ,खडकी पुणे, असे असून त्याचे ताब्यातील तीनचाकी रिक्षा बाबत 41(ङ) खडकी पोलीस स्टेशन येथे कारवाई केली.तपासात सदर रिक्षा ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले व सदर रिक्षा चोरीबाबत भोसरी पो.स्टे. गु.रजि. नं.५२८/२०२१ भादविक.३७९ (तीनचाकी रिक्षा किंमत रु.५०,०००/-) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
 आरोपीस अधिक चौकशी करिता दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ येथील कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याने अजून ४ रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरी केलेल्या वाहनांबाबत तपास केला असता 

१) खडकी पो.स्टे गु.रजि.नं. २३३/२०२१ भादविक.३७९ (तीनचाकी रिक्षा किंमत रु. ८०,०००/-)

२)खडकी पो.स्टे गु.रजि.नं.२३९/२०२१ भादविक.३७९ (तीनचाकी रिक्षा किंमत रु. ५०,०००/-)

३) खडकी पो.स्टे गु.रजि.नं.२४०/२०२१ भादविक.३७९ ( तीनचाकी रिक्षा किंमत रु. ५०,०००/-)

४) खडकी पो.स्टे.गु.रजि.नं.२४१/२०२१ भादविक ३७९ (तीनचाकी रिक्षा किंमत रु. ४०,०००/-)
अन्वये चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
वरीलप्रमाणे अशा एकूण 5 रिक्षा कि. २,७०,००० /- रु.चा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त केला व आरोपी निष्पन्न करून वरीलप्रमाणे गुन्हे उघड केले आहे.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकामी खडकी पोलीस स्टेशन ,पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

    *सदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. अशोक मोराळे सर, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. लक्ष्मण बोराटे सर यांचे मार्गदर्शनात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हेशाखा ,पुणे शहर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे*.


  मा. सादर व्हावे 
 *(सुनील पंधरकर )*
 *पोलीस निरीक्षक*

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *