पती-पत्नीच्या दररोजच्या भांडणामुळे 5 महिन्याच्या चिमुकलीचा गेला जीव..
पती-पत्नीच्या दररोजच्या भांडणामुळे 5 महिन्याच्या चिमुकलीचा गेला जीव

पती-पत्नीच्या भांडणामुळे जन्मदात्या पित्याने 5 महिन्याच्या चिमुकलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे हिंजवडी भागातील बावधन येथे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याघटने प्रकरणी पित्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
संगीता बापूराव जाधव (वय ५) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव असून आरोपी वडील बापुराव जाधव (वय 35) यास अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस पगारे हे करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पाच महिन्याच्या खूनाचा आरोपी पिता बापूराव वाहनचालक असून तो लॉकडाऊनमुळे घरीच असल्याने त्याचे पत्नीसोबत भांडण होत होते.
दररोज होणाऱ्या भांडणाचा राग त्याने पाच महिन्याच्या चिमुकलीवर काढत शनिवारी पहाटेच्या सुमारास पत्नी गाढ झोपेत असताना जन्मदात्या बापाने पाच महिन्याच्या चिमुकलीचा गळा दाबून खून केला
घराच्या समोरील पटांगणात चिमुकलीचा मृतदेह ठेवून घरात येऊन पत्नीला झोपेतून उठवून मुलगी कुठे आहे ? असा प्रश्न करत आरोपी पिता हा चिमुकलीच्या आई सोबत चिमुकलीचा शोध घेण्याचे नाटक करत होता.
तेवढ्यात काही अंतरावर पटांगणात कुत्रे भुंकू लागल्याने चिमुकलीची आई धावत त्या ठिकाणी गेल्यावर चिमुकली निपचित पडलेली आढळून आल्याने आईने हंबरडा फोडला.
आरोपी पित्याने हिंजवडी पोलिसांना या बाबत घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिसांना त्याच्यावरच संशय आल्याने पोलिसांनी चिमुकलीच्या पित्यावर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबुल केला.