दुकानासमोर उभे राहिल्याने चाकूने केला पोटात वार ! चुडामण तालीम भवानी पेठेतील घटना, ,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
चाकूने केला पोटात वार चुडामण तालीम भवानी पेठेतील घटना ! दुकानदाराला अटक,
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीसआली आहे. दुकानासमोर गप्पा मारत उभे राहू नको, असे सांगून देखील न ऐकल्यामुळे दुकानदाराने तरुणाच्या पोटात चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना ५ सप्टेंबर रोजी पावणे चार वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील दिनशी अपार्टमेंट येथे घडली आहे.दुकानासमोर गप्पा मारत उभे राहू नको, असे सांगितल्यावरही तरुणाच्या पोटात चाकूने वार करुन जबर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अंकुश राम मगर (वय ३८, रा. चुडामण तालीम चौक, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फरहाज अक्रम कुरेशी (वय २८, रा. चुडामण तालीम चौक, भवानी पेठ) याला अटक केली आहे. ही घटना भवानी पेठेतील दिनशी अपार्टमेंट येथे गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अनिल हे दोघे दिनशी अपार्टमेंट समोर गप्पा मारत उभे होते.तेथेच फरहाज कुरेशी याचे लब्बाईक चिकन सेंटर आहे.हे उभे असताना कुरेशी याने “इथे माझ्या दुकानाशेजारी थांबून बडबड करुन नका, दुसरीकडे जावा,” असे सांगितले.त्यावर फिर्यादी यांनी “तुझ्या दुकानाच्या समोर उभा नाही राहिलो,” असे बोलले. त्यावर त्याने शिवीगाळ करत “इथे कशाला येऊन बसतो,” असे म्हणून त्याने चिकन सेंटर दुकानामधील चाकू घेऊन बाहेर आला. रागाने फिर्यादी यांच्या पोटालगत चाकूने वार केला.

चाकू लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागल्याने फिर्यादी आरडाओरडा करु लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची आई व तेथील रहिवासी आले. त्यांनी फिर्यादी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन फरहाज कुरेशी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
