रिक्षात विसरलेली बॅग सीसीटिव्ही कॅमेरे समर्थ पोलिसांनी तपासून परत मिळवून दिलीapcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
रिक्षात विसरलेली बॅग सीसीटिव्ही कॅमेरे समर्थ पोलिसांनी तपासून परत मिळवून दिली,
पुण्यात मित्राला भेटण्यासाठी दि. 8/09/2024.आलेल्या केरळीयन तरुणाची बॅग रिक्षात विसरली होती.रोजी इसम नामे रियाज अहमद के.पी., वय 48 वर्ष रा.कोझिकोड, केरळ हे सकाळी 10/30 वा.चे सुमारास पुणे स्टेशन येथून त्यांचे मित्र उमर करीम फारुख वय 42 रा. रास्ता पेठ पुणे यांना भेटण्यासाठी रिक्षात बसून 10.45 वा.चे सुमारास रास्ता पेठ येथे आले होते. रिक्षातून उतरल्यावर काही वेळाने त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
समर्थ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचालकाकडून ही बॅग परत मिळवून दिली.
रियाज अहमद के पी (वय ४८, रा. कोझीकोड, केरळ) रविवारी सकाळी साडेदहा वाजता पुणे रेल्वे स्टेशनला आले. त्यांनी रास्ता पेठेतील त्यांचे मित्र उमर करीम फारुख (वय २४) यांना भेटण्यासाठी रास्ता पेठेत आले. रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने त्यांना आपली एक बॅग रिक्षामध्येच विसरली असल्याचे लक्षात आले. बॅगेमध्ये कपडे, मौल्यवान वस्तू व महत्वाची कागदपत्रे होती.

तक्रार देण्यासाठी ते समर्थ पोलीस ठाण्यात आले. त्यांची हकीकत ऐकून घेतल्यानंतर तपास पथकाचे पोलीस अंमलदार घोरपडे, हवालदार इमरान शेख यांनी त्या परिसरातील ६ ते ७ सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या रियाज हे ज्या रिक्षातून आले होते. त्या रिक्षाचा क्रमांक मिळविला. त्यावरुन रिक्षाचालक अरुण पवार (वय ५०, रा़ मानस लेक, सिटी ग्रँड टॉवर) यांच्याशी संपर्क साधला. रिक्षाचालकाने तातडीने रिक्षात विसरलेली बॅग परत आणून दिली. बॅगेतील सर्व वस्तू सुस्थितीमध्ये मिळाल्याने रियाज अहमद यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in