पोलिसांना घाबरून उडी मारलेल्या जुगाऱ्याचा मृत्यू;
जुगाराची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना पाहून घाबरलेल्या एकाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या नाना पेठेत रात्री ही घटना घडली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
यापूर्वीही सिंहगड रोड परिसरात पोलीस कारवाईसाठी गेले असता इमारतीवरून उड्या मारून जात असताना एकाचा मृत्यू झाला होता. ब्रायन रुडॉल्फ गिअर (वय ५४, रा. बाणेर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलीस आयुक्तांच्या कडक आदेशानंतरही छुप्या पद्धतीने अन् स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याचे आढळत आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला नाना पेठेतील क्राईस्ट चर्चसमोर लाजवंती निवास येथे पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, युनिट एकचे वरिष्ठ अधिकारी तसेच त्यांचे पथक येथे कारवाईसाठी आले असता दार बंद असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आतून कोणीतरी पोलीस आल्याची माहिती दिली आणि एकच गोंधळ उडाला.
जुगार सुरू असलेला फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता. त्यामुळे खेळणाऱ्यांची धावपळ उडाली. तेथील काही व्यक्तींनी थेट खाली उड्या मारत पळून जाण्याचे प्रयत्न केले. काहींनी इमारतीच्या पाईपवरून तर काहींनी तशाच उड्या मारल्या. त्यात ब्रायनने उडी मारल्यानंतर त्यांला गंभीर मार लागला. त्यांचा एक पाय फॅक्चर झाला होता. त्यामुळे एका नामांकित रुग्णालयात त्याला दाखल केले. मध्यरात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
ब्रायन यांच्यासोबत आणखी एक व्यक्तीही जखमी झाल्याचे कळते. त्याबाबत पोलिसांना काहीही माहिती नाही. सूत्रांच्या माहितीनुसार या ठिकाणी पत्त्यांचा मोठा क्लब भरवला जात होता. एका नामांकित व्यक्तींचा हा क्लब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
*फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा*..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
*आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
*आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
